मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

ऋण


ऋण


तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात


नाही राजा ओढवत
चार पाउल नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर


माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारू शिवी


माझा घालवाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ


अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत


मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा ए कदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे
.........................................

सहावीच्या पाठ्यपुस्तकातील श्री.दि.इनामदार यांची ही कविता शेतात राबून म्हातारा झालेल्या बैलाची व्यथा यात रेखाट्लेली आहे.मला भावली म्हणून तुमच्या समोर आणली.
....................................................................................................................................

२ टिप्पण्या: