
हिंमत द्या थोडी
नका नाका मला
देऊ नका खाऊ ,
वैरी पावसानं
नेलामाझा भाऊ
महापूरामध्ये
घरदार गेलं,
जुल्मी पावसानं
दप्तरही नेलं
भांडी कुंडी माझी
खेळणी वाहिली,
लाडकी बाहुली
जाताना पाहिली
हिंमत द्या थोडी
उसळू द्या रक्त,
पैसाबिसा नको
दप्तर द्या फक्त.
..................................
................................................................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा