रुमाल
किती तरी घाम
कितीक आसवं
अन् रुमाल एकच
हा रुमाल विसावतो
त्यांच्या खिशात
जे नेसलेले असतात
सदरा ,पँन्ट टाय वा
जीन्स-टी शर्ट
सगळ्यात जास्त घाम नि
आसवं असतात
त्यांच्या हिशोबी
ज्यांच्याकडे रुमाल
ठेवण्याजोगे
खिसेच नसतात.
.........................................................
ही कवीता मूळ हिंदी असून ती हरी म्रुदूल यांची आहे.मरठी अनुवाद शब्बिर अहमद दाउद यांनी केला आहे. मला आवडली म्हणून तुमच्या पुढे ठेवतोय.
..................................................................................................
काशिद बीच
१३ वर्षांपूर्वी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा