सोमवार, १४ डिसेंबर, २००९

देवाचे घर


इवल्या इवल्याशा, टिकल्या टिकल्यांचे

देवाचे घर बाई , उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी


निळी निळी वाट,
निळया निळया डोंगरात निळी निळी दरी


चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कै


देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी



ग. दि. माडगूळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा