सोमवार, १४ डिसेंबर, २००९

टप टप टाकित टापा


टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !


उं उभारी दोनही कान
ऐटित वळवी मान- कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !


घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता सवार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा


सात अरण्ये, समुद सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !


शांता शेळके

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा