मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
पान्या वर्हल्यारे लाटा
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसा वारा वाहादनं
मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे ,ईचू साप बरा
त्याले उतारे मंतर
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात ?
आता व्हत भुईवर
गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धर
तठे व्हय्सीन ईज
आलं आलं धरतीवर
मन एवढं एवढं
तसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
आभायात बी मायेना
देवा कसं देलं मन
आस नही दुनियात
आसा कसा रे,तू योगी
काय तुझी करामत
देवा आसं कसं मन
आस कस रे घडलं
कुठे जागे पनी तुले
असं सपान पडलं।
बहिणाबाई
काशिद बीच
१३ वर्षांपूर्वी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा