सोन्यारूपान मढ़ला
मारवाड्याचा बालाजी
शेतक-याचा ईठोबा
पानाफूलामाधी राजी
अरे बालाजी - ईठोबा
दोन्ही एकज रे देव
सम्रितीनं गरीबींन
केला केला दुजाभाव
बहिणाबाई
काशिद बीच
१३ वर्षांपूर्वी
परवा आमच्या घरात एक फुलपांखरु आलं अतिशय सुंदर फुलपांखरु होतं ते, त्याला पाहाता-पाहाता माझ्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले.छान ! आणि मला लहानपणाची ती कविता आठवली फुलपांखरु I छान किती दिसते I फुलपांखरु . तुम्हाला आठ्वतात का अशा काही कविता..या ब्लाँगच्या निमित्ताने त्या आठवू .इतरंना सांगू .कुणी विसरले असेल तर त्याला या माध्यमातून त्या कवितेजवळ नेऊ.आजीच्या जवळचे घड्याळ असेल नाहीतर लाडकी बाहुली असेल.कुणाला काहितरी सापडेलच की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा