शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

या बाळांनो

या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया

खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया

भा. रा. तांबे

1 टिप्पणी:

  1. लहानपणी हीच कविता किती कठीण होती, आता वाचायला मस्त वाटते आहे. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा