आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोकाकारी
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी
चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठयात वासरांना, ह्या चाटतात ग़ाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई
येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
कवि - यशवंत
काशिद बीच
१३ वर्षांपूर्वी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा