मंगळवार, २४ नोव्हेंबर, २००९

शाळा

शाळा सुटली पाटी फुटली
आई,मजला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडु,चापट पोळी
नको देउ,मज हवीच गोळी
किंवा दे गं खमंग चकली
दे ना लवकर भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावरि खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाउ, भूक लागली

योगेश्वर अभ्यंकर

1 टिप्पणी: